ANN & GTPL न्यु नेटवर्क ब्युरो दिनांक १२ जून मंगळवार २०२३ -: अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीच्या (crime news) प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ४ जून रोजी अकोला जिल्यातील दहिगाव गावंडे या गावाजवळ एक महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळलं त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.आपल्या आई सोबत आपले पटत नसल्याने व आई सतत आपल्या रागवत असल्याने संतापाच्या भरात कट रचत तिच्याच पोटच्या १५ वर्षीय मुलाने आईचा दगडानं ठेचून खून केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.
म्हणतात ना मुलाचा जीव आईत आणि बाबांचा जीव मुलीत अडकला असतो हे फक्त वाचायला छान वाटत पण आजच्या या युगात कोणाचे कोणा बाबतीत प्रेम राहिले नाही मग तो सक्ख्या मुलगाच का नसो अशीच एक धक्कदायक घटनेचा तपास अकोला स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने लावल्याने हि धक्कदायक बाबा समोर आली असून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या संख्या आईची हत्या केली
काय होते नेमके प्रकरण ?
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दहीगाव गावंडे येथील मृतक संगीता राजु रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे) हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे इथे ती राहत होती. रविवार म्हणजे ४ जूनपासून संगीता ही गावातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सारखी रागवायची म्हणून आईला संपवलं
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. मुलाने शिक्षण सोडून दिलं होतं, म्हणजेच शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं.
या हत्येचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. संगीता हिच्याच पंधरा वर्षे पोटच्या मुलानं तिची (आईची) हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. हा तपास अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, अन्सार शेख, राहुल गायकवाड, चालक अनिल राठोड यांनी केली.