Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रग्राहक सेवा केंद्र नसून लुटीचे केंद्र गोर गरीब नागरिकांकडून व्यवहाराचे आकारले जाते...

ग्राहक सेवा केंद्र नसून लुटीचे केंद्र गोर गरीब नागरिकांकडून व्यवहाराचे आकारले जाते अतिरिक्त शुल्क

अकोला न्युज नेटवर्क गणेश बुटे प्रतिनिधी अकोट दी. १९ जानेवारी :- नागरिकांना शैक्षणिक तसेच इतर कामांसाठी लागणारे दाखले सुलभ तसेच जलद मिळावेत, यासाठी शासनाच्यावतीने महा-ई-सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या केंद्रामधून दाखले देण्याच्या नावाखाली शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम नागरिकांकडून वसूल केली जात आहे.

त्यामुळे ही महा-ई-सेवा केंद्र नसून, लूट केंद्रे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर भारतीय स्टेट बँकेच्या काही ग्राहक सेवा केंद्रात देवाण-घेवाण व्यवहार करताना खातेदारांकडून केंद्र चालक आगाऊ रक्कम घेऊन खातेदारांची लूट करीत आहेत, असा आरोप खातेदार करीत आहेत.

खातेदारांना वीस हजार रुपयांच्या आतील देवाण-घेवाण व्यवहार करता यावे तसेच बॅँकेत खातेदारांची गर्दी होऊन नये जेणे करून खातेदारांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत; तसेच नवीन खाते उघडण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना मदत करावी. खातेदारांना तत्पर व चांगली सेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आले ग्राहक सेवा केंद्राचे चालक खातेदारांकडून आगाऊ रक्कम घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करीत आहेत.

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्रात चालकांना देवाणघेवाण व नवीन खाते उघडण्यासाठी ठरावीक रक्कम (कमीशन) देण्यात येते; तसेच होम बॅँकेत पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र चालकांनी मोफत सेवा द्यावी, असा आदेश आहे.

परंतु, चोहोट्ट बाजार परिसर मध्ये मोठ्या प्रमाणात पर प्रांतीय मजूर कामाकरीता विट भट्यावर आले असताना त्यांना आपले गावी पैसे पाठवणे,इतर सेवा करिता ग्राहक सेवा केंद्र मध्ये येतात. मात्र काही ग्राहक सेवा केंद्र चालक या मजुरांचे फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण चे व्यवहारावर अधिक रक्कम घेऊन देवाण घेवाण शुल्क आकारून नागरिकांचे लूट करीत आहेत.

काही केंद्र चालक हे खातेदारांकडून आगाऊ रक्कम घेऊन खातेदारांची लूट करीत आहेत. पासबूक साठीही खातेदारांकडून रक्कम घेत असून, बॅँकसुद्धा पासबूक देण्यात आले म्हणून खातेदारांकडून शुल्क घेत असल्याने खातेदारांत नाराजीचा सूर उमटत आहेत. बॅँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन खातेदारांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp