ANN अकोला नेटवर्क ब्युरो तेल्हारा-प्रतिनिधी आशिष वानखडे दि. 9 जुन :- तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी यांच्या सह औषध निर्माण अधिकारी, प्रयोग शाळा अधिकारी, आरोग्य सह्यिका, मुख्यलाय आरोग्य सेविका, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी यांची व इतर पदे रिक्त असल्यामुळं एका एका व्यक्तीकडे किमान दोन पदाचा तर काही लोकांकडे तीन पदाचा कार्यभार देण्यात आला आहे .
त्यामुळें त्यांच्या कामावर परिणाम म्हणून. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 34 गावांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पंचगव्हाण परिसरातील तसेच खेड्यापाड्यातील व गावातील गोरगरीब नागरिक हे प्रथमोपचार हा पंचगव्हाण आरोग्य केंद्रातच करुन घेतात. त्यामुळे दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. परंतु कर्माच्यांची संख्या कमी असल्यामुळे तेथे रुग्णांना सेवा प्रदान करण्यासाठी अडचण येते. अर्धे कर्मचारी, अधिकारी वर्गचं रिक्त असल्याकारणाने आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
रिक्त पदे असल्याकारणाने पर्याय ऊरत नसल्याने नागरिक खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावा लागत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना सुध्दा अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंन्द्रात ३४ गाव येत असुन त्या ३४ गावाचा कारभार चालवण्याचा कार्यरत कर्मचारी केविलवाणा प्रयत्न करत आहेत त्यामुळें त्यांच्यावर कामाचा ताण येत असल्यामुळे पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र मधील रिक्त पदे त्वरित भरावे याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सिद्धार्थ गवारगुरू प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका, प्रफुल मोरे ग्रामपंचायत सदस्य खेल देशपांडे, भास्कर गवारगुरू माजी सरपंच, विजय गवारगुरू इत्यादी उपस्थित होते. तरी या विषयाची संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी पंचकोन परिसरातील नागरिक करीत आहेत.