Friday, July 19, 2024
Homeब्रेकिंग15 ऑगस्टला दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट, महाराष्ट्र ATSकडून कसून चौकशी

15 ऑगस्टला दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट, महाराष्ट्र ATSकडून कसून चौकशी

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-महाराष्ट्र ATS आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून येत्या 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना असलेल्या अल सुफा आणि आयसिससोबत संबंधित अनेकांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे.या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅबही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र ATSने या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता येत्या 15 ऑगस्टला देशात दहशतवादी कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचं उघडकीस झालं आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतासह इस्त्रालय असल्याचं स्प्टष्ट झालं आहे.

मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शाहनवाज आलम अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. यामधील अटक करण्यात आलेल्या बरोडावालाने ठाण्यातील पडघा या ठिकाणी भाड्याने फ्लॅट घेतला होता. याचा तपास आता ATS करत आहेत. मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने हा फ्लॅट घेतला होता का? याचा तपास महाराष्ट्र ATS पथक करत आहे.ATSने अलीकडेच झुल्फिकार अली बडोदावाला याला ताब्यात घेतले होते, ज्याला एनआयएने ISIS मॉड्यूलशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात अटक केली होती. दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुण्यातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले होते. तसेच निपाणी आणि संकेश्वर येथे मुक्कामही केला होता. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती.मध्य प्रदेशातून पुण्यात तळ ठोकून बसलेल्या दहशतवाद्यांनी कोकणात प्रशिक्षण घेऊन 15 ऑगस्टला घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे गुप्तचर यंत्रणांना हाय अलर्ट जारी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp