Monday, September 16, 2024
Homeब्रेकिंगखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने...

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उशिरा रात्री घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी शेख जावेद शेख करीम वय ३० वर्ष या युवकाने शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी खदान पोलिसांना सांगितले. यावरून खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp