Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीदुचाकीच्या धडकेत महिला पोलीस कर्मचारी ठार

दुचाकीच्या धडकेत महिला पोलीस कर्मचारी ठार

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २४ सप्टेंबर २०२३ :-दुचाकीवर मागे बसलेली महिला पोलीस कर्मचारी जागेवरच ठार झाली स्थानिक गाडगेनगरस्थित गाडगेबाबा मंदिरानजिक मागून दिलेल्या धडकेत. २४ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला. दारूच्या नशेत धडक देणाऱ्या वाहनचालकास अटक करण्यात आली.

प्रियंका बोरकर (२६, रा. शेगाव, अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्या ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (सिआरओ) कार्यरत होत्या. सर्व पोलीस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेऊन त्या रात्री दोनच्या सुमारास ड्युटी संपवून पती सागर रमेश सिरसाट (रा. शेगाव) यांच्यासह मोपेडने घराच्या दिशेने शेगाव नाक्याकडे जात होत्या. त्यावेळी गाडगेबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच १२ आर डब्ल्यू ७५३०) त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. यात प्रियंका यांच्या डोक्याला व शरिराच्या अन्य भागाला जबर मार लागला. त्यामुळे घटनास्थळीच त्यांना अतिरक्तस्त्राव झाला. पती सागर सिरसाट यांनी पत्नी प्रियंका हिला काहींच्या सहकार्याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र अतिरक्तस्त्रावाने प्रियंका यांचा रविवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपी घटनास्थळीच पकडला
सागर सिरसाट यांच्या दुचाकीला मागून धडकताच दुचाकीस्वार गौरव गोपाल मोहोड (३३, रेखा कॉलनी) हा देखील दुचाकीसह खाली कोसळला. तो मद्यधुंद अवस्थेत तेथेच पडून राहिला. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१७ पासून होत्या कार्यरत
पोलीस सुत्रानुसार, प्रियंका बोरकर या सन २०१७ मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून रूजू झाल्या होत्या. तर गेल्या एक वर्षांपासून त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच ग्रामीण वाहतूक शाखेचे! प्रमुख गोपाल उंबरकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अंतिमसंस्कारावेळी ग्रामीण पोलिसांतर्फे प्रियंका यांना श्रध्दांजली देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp