ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. सोमवार 12 जुन :- अकोला जिल्ह्यात एका मागे जण खुनाचे सत्र सुरु असून शहरात हत्या होणे हा चिंतेचा विषय बनला आहे. काल रात्री देखील अकोला रेल्वे स्टेशन गेट नंबर 2 वर भर गर्दीच्या समोर चाकूने सापासप वार करून एका युवकाची निर्घून हत्या करण्यात आल्याने स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून हत्या झालेल्या युवकाची कारकीर्द देखील गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे बोलल्या जात आहे.
ह्या कारणाने केल्यागेली हत्या…
मिळालेल्या माहिती नुसार अकोला शहरातील बस्थानक मागील आंबेडकर नगर येथे अनिल याची नावाचा युवक राहत असून बस स्थानकावर आपली दहशद गाजवत होता अनिल याची याच्यातवर या आधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल होते याचं बस स्थानका बाहेरील बाजूस अकोट फाईल परिसरात राहणाऱ्या सोनू उर्फ रवी ओंकार त्रिपाठी याचे चहाचे दुकान आहे
याचं दुकानावर काही दिवसा पूर्ण सोनू उर्फ रवी त्रिपाठी यांच्या भावासॊबत अनिल याची याचे भांडण झाले होते या भांडणात रवी च्या भावाला अनिल याची ने जबर मारहाण केली असून त्याच्यावर याचं भांडणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता अनिल याची व सोनू उर्फ रवी त्रिपाठी याचा हा वाद काल उफाळून आला आही हे हत्याकांड घडले.
रविवार दिनांक 11 जुन 2023 रोजी रात्रीच्या सुमरस अनिल याची हा अकोला रेल्वे स्टेशन वर असल्याची माहिती रवी त्रिपाठी याला मिळाली रवी त्रिपाठी व अनिल याची हे आमने सामने आल्यावर जुन्या झालेल्या भांडणवरून पुन्हा याच्यात खटके उडाले वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यातच अनिल याची याला सोनू उर्फ रवी त्रिपाठी याच्यावर चाकून सपासप वार करण्यास सुरवात केली
अनिल रताळ याच्या गळ्यावर चाकून वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अनिल याची याला अकोला सरोपचार रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, रामदास पेठ पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तसेच पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाले.
अशा प्रकारे पकडले गेले या खुनातील आरोपी…
हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी रवी ओंकार त्रिपाठी हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला असून आपण एकट्यांचे ही हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले पण रामदास पेठ पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना आरोपी रवी त्रिपाठी वर संशय आल्याने त्यांनी स्टेशन परिसरात जिथे हत्या झाली तेथील सीसी टीव्ही फुटेज रामदास पेठ पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांना तपासण्यास सांगीतिकव सिटी टीव्ही फुटेज चेक केले असता या हत्येत आणी तीन आरोपी असल्याचे समोर आल्याने पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी आपले पथक आरोपींच्या मागावर पाठवले.
या हत्ये प्रकरणार पोलिसांनी आणखी तीन आरोपी सोनू गौतम बनसोडे, वय 20 वर्ष राहणार अकोट फाईल, अमर महेंद्र उज्जैनकर वय 20 वर्ष राहणार आपातापा रोड व अभिजत संभाजी हांडे वय 23 वर्ष राहणार लाडीस फाईल या आरोपीना अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहराचे सुभाष दुधगावकर यांच्या मर्दर्शना खाली
अकोट फाईल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रशांत इंगळे, अस्लम शाहा, गिरीश तिडके व छोटू पवार यांनी काही तासाच्या आतच अटक करून रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे जमा केले. असता रवी त्रिपाठी व वरील चार आरोपींनी मिळून अनिल रताळ याची याची हत्या केल्याचे समोर आले असून नेमकी ही हत्या आपसी वादातून झाली की आणखी काही याचा सखोल तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.
अकोला रेल्वे स्टेशन येथील गेट नंबर दोन वर भर गर्दीत हे हत्याकांड झाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात दहशदीचे वातावरण पसरले होते शहरात हत्या घडत आहेत प्रत्येक हत्येतिल आरोपी देखील तात्काळ पकडले जात असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्या घडणे हा अकोला पोलिसांसाठी चिंतनाचा विषय ठरला आहे असे म्हणणे वावागे ठरणार नाही….