अकोला न्यूज नेटवर्क धनराज सपकाळ प्रतिनिधी मूर्तिजापूर दिनांक १९ सप्टेंबर २०२३ :–मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम मुखेड येथील महिला बालकल्याण विभागामार्फत नवीन अंगणवाडीचे बांधकाम अंदाजे 11 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. पण झालेले हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या,कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा सखोल तपास करावा अशी मागणी
मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या मुखेड येथील अंगणवाडीचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे झाले असून कामाला लागणारे साहित्य विटा कच्च्या, गिट्टीवर साईज, दगडाची बुकटी असलेली वास क्रश न करता साहित्य वापरण्यात येत आहे. जी कॉलमची खालील फुटींग कच्चा मुरूम व धुमस न करता बेट काँक्रेट करण्यात आले आहे. बांधकाम इंजिनियर इंगळे यांना गावातील नागरिकांनी संपर्क केला असता फोन न उचलणे, इमारतीचे काम मोहिते नामक ठेकेदाराला दिली असल्याचे चर्चा असून ही इमारत इंगळे इंजिनियर स्वतः बांधत आहे की ठेकेदार हा नावापुरता ठेवलेला आहे अशी जनसामान नागरी मध्ये चर्चेला उधाण आले आहे.
उपविभागीय बांधकाम जिल्हा परिषद अभियंता उमाळे यांनी बांधकाम बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा इमारतीचे बांधकाम सुरूच आहे यावरून नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. या इमारतीच्या बांधकामामध्ये साहित्याचा मोठा भ्रष्टाचार झाला असून भविष्यात या इमारतीमध्ये दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भविष्यात लहान मुलांच्या जीवनाशी खेळ संबंधित अधिकारी करत असल्याचे निदर्शनात येतआहे. तरी वरिष्ठ अधिकार्यांनी कॉलिटी कंट्रोल मार्फत साहित्याची तपासणी करून झालेले बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. धनराज सपकाळ दद न्युज मूर्तिजापूर.