अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :-अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण या ठिकाणावरून हटविण्यात आल्यानंतर एका युवकाने रविवारी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन कारवाई केली.जिल्हा स्त्री रुग्णालय बाजूला असलेले छोटे-मोठे व्यावसायिक यांची दुकाने असून, रविवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही दुकाने तोडण्यात आली. गत पंधरा दिवसांपूर्वीही कारवाई करण्यात आली होती. येथील अतिक्रमण काढल्यामुळे व्यावसायिकांवर
उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांना दोन ते तीन वेळा निवेदने देऊन, पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने २३ जुलै रविवार रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर व्यावसायिक रवी सरदार या युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, रामदास पेठ पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे, संतोष गवई, आकाश जामदे, रोशन पटले, राजेश मसने, सुभाष करणकार यांनी प्रयत्न केले.