अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४:- शासकीय इमारतींचे बदलण्याबरोबरच शाळांमधील स्वरूप शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक योजना आहेत. त्याच अनुषंगाने ‘आदर्श शाळा’ योजनेंतर्गत महापालिकेच्या उर्दू शाळा क्र. ८ च्या नवीन इमारतीसाठी प्राप्त झालेली पहिल्या हप्त्याची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे. समन्वयाअभावी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाकडे ती अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीच्या निविदेला उशीर होत आहे. त्यामुळे लकडगंजच्या उर्दू शाळेची दुरवस्था झाली आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे.
नुकतेच’ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानही सुरू करण्यात आले आहे. पोषण आहार योजना सुरू असून शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण आणि नवीनीकरण आदर्श शाळा अभियानांतर्गत केले जाते. या अभियानांतर्गत अकोला महापालिकेच्या लकडगंज येथील.
शाळा झाली पन्नास वर्षाची
■ लकडगंजची उर्दू शाळा १९६८ मध्येच बांधण्यात आली होती. गेल्या ५५ वर्षांत इमारतीची अवस्था जर्जर झाली आहे. मोडकळीस आलेली इमारत पाडून नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे, मात्र महापालिकेचा शिक्षण विभाग व प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे. आदर्श शाळेला मिळालेला निधी योग्य वेळी वापरला असता तर कदाचित वर्षभरात नवीन इमारत बांधता आली असती, परंतु तसे झाले नाही.या शाळेची विद्यार्थी संख्या ८००
■ साधारणतः कॉन्व्हेंट कल्चरमुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही लकडगंजच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही ८०० च्या आसपास आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीत शिकणारे विद्यार्थी नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत.