अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :-भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत असते. मागच्या महिन्यात सोन्या-चांदीच्या दराने सातत्त्याने उसळी घेतली होती. मे आणि जून महिन्यात सोन्याच्या भावाने ग्राहकांना दिलासा दिला होता.परंतु, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे या महिन्यातही खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडू शकते. सध्या सोन्याच्या भावात ६० हजार रुपयांवर पोहोचला आहे. अशा स्थितीत आता ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत दिलासा कायम राहणार की नवीन विक्रम नोंदवणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून असेल. जाणून घेऊया आजचा भाव.
- आजचा सोन्याचा भाव
काल बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार आज सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी ५९,५५० रुपये मोजावे लागले तर आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,550 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,570 रुपये मोजावे लागणार आहे. मागच्या भावानुसार आज २२ कॅरेटच्या भावात 100 रुपयांनी वाढ झाली तर २४ कॅरेटच्या भावात 140 रुपयांनी (Money) कमी झाले आहेत. - चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार २८ जुलैला चांदीच्या (silver) १० ग्रॅम भावासाठी 780 रुपये तर 1 किलो चांदीसाठी 78,000 रुपये मोजावे लागणार आहे. - तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार मुंबईमध्ये २४ कॅरेटसाठी ६०,४४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४४० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४७० रुपये आहे. - हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ऑक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.