अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :- नांदुरा तालुक्यात धाडसी दरोडा धारदार शस्त्राने वार करत वडाळी गावात टाकला 6 लोकांनी दरोडा गावात पसरली दहशत
बुलढाणा जिल्ह्यातील नादुरा तालुक्यात येत असलेल्या वडाळी या गावात रात्रीच्या दरम्यान सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून लाखो रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी पसार केल्याने गावात तसेच परिसरात दहशद पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात वडाळी गावात सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. धारदार शस्त्राने घराबाहेर झोपलेल्या पती-पत्नीला मारहान करत अंगावरील सोन्याचे दागिन्यांसह घरातील लाखो रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला आहे. मध्यरात्री दीड वाजेदरम्यान एका महिलेसह सहा दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. त्यामुळे दरोडेखोरांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचं पाहायला मिळतय. दरोडेखोरांनी केलेल्या जखमी दोघांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल आहे. नांदुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सहा दरोडेखोरा विरोधात नांदुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दरोडेखोरांचा शोध आता नांदुरा पोलीस घेत आहेत..