अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :-तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीतील वाटेगाव येथे झाला. अण्णा भाऊ शाळेत शिकलेले नाहीत, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले.नंतर तेथील सवर्णांद्वारे होणार्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.नंतर ते पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे २० हजार लोकांचा मोर्चा काढला.
ते नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कथांचा वापर केला. यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबर्या लिहिल्या. त्यांच्या लघु कथांचा संग्रह आहे.त्यातील मोठ्या संख्येने बर्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. त्यांच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अशा या थोर समाजसुधारकाचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.