अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जुलै :- चेहऱ्यावरील आलेली हे डार्क सर्कल लपविणेही शक्य नसते. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्व प्रभावित होते आणि तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. मेकअपचा वापर करून काही काळ हे डार्क सर्कल लपवता येऊ शकतात. मात्र डार्क सर्कल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी त्यावर काही उपाय करणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला हे डार्क सर्कल काढून टाकण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत.
टी बॅग : टी बॅगमध्ये असलेले कॅफिन रक्तवाहिन्या आकुंचन करण्यास मदत करते आणि रक्त प्रवाह वाढवते. यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा वापर केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होऊ लागतात. दूध : थंड दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. डार्क सर्कल कमी करण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात थंड दूध घ्या आणि कापसाच्या मदतीने ते थंड दूध डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटे तसेच लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने डोळ्याखालची डार्क सर्कल कमी होतात. बटाटे : बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे बटाट्याचा रस डार्क सर्कलवर सतत लावल्याने ते हळूहळू कमी होतात. हे लावण्यासाठी प्रथम बटाटा किसून घ्या. नंतर त्या बटाट्याचा रस काढा. त्यानंतर कापसाच्या मदतीने बटाट्याचा रस डोळ्यांखाली आणि आजूबाजूला लावा.