अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २५ ऑगस्ट २०२३:-तुमच्याकडे अजूनही 2000 ची नोट असल्यास ती लवकर बदलून घ्या. कारण या नोटा बदलून देण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ दिला आहे. मात्र, दरम्यान, पुढील महिन्यात 17 दिवस बँका बंद राहणार असून बँका केवळ 13 दिवसच सुरू राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नोटा बदलायच्या असतील तर त्या लवकरात लवकर बदलून घ्या, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीला सामोरे जावे लागू शकते. सप्टेंबरमध्ये बँका कि दिवस बंद राहणार आहेत ते जाणून घ्या.

भारतात काही दिवसात सणासुदीला सुरुवात होणार आहे, सप्टेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करा, अन्यथा तुम्हाला नंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. पुढील महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाणून घ्या-

सप्टेंबरमध्ये इतके दिवस बंद राहणार बँका

6 सप्टेंबर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी
7 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: जन्माष्टमी (श्रावण वद-8) /श्री कृष्ण अष्टमी
18 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: वर्षसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी
19 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: गणेश चतुर्थी / संवत्सरी(चतुर्थी पक्ष)
20 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुखाई
22 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: श्री नारायण गुरु समाधी दिन
23 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन
25 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: श्रीमंत शंकरदेव यांची जयंती
27 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)
28 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस ) ( बारा वफत)
29 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी: ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा / शुक्रवार.

साप्ताहिक सुट्टी
3 सप्टेंबर : रविवार
9 सप्टेंबर : दुसरा शनिवार
10 सप्टेंबर : दुसरा रविवार
17 सप्टेंबर : रविवार
24 सप्टेंबर : रविवार


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!