Friday, December 6, 2024
Homeताज्या घडामोडीशेतकऱ्यांचा विद्युत लोड सेटिंग च्या विरोधात एल्गार मोर्चा

शेतकऱ्यांचा विद्युत लोड सेटिंग च्या विरोधात एल्गार मोर्चा

अकोला न्यूज नेटवर्क धनराज सपकाळ प्रतिनिधी अकोला दिनांक १० जानेवारी २०२४ :- तुळजापूर मूर्तिजापूर उपविभाग अंतर्गत ग्रामीण मुर्तीजापुर 2 शेती फिडरचे महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. किनखेड एजीवर खूप लोड असल्यामुळे या फिटरवर दोन टप्प्यात पूर्वी लोड शूटिंग घेतल्या जात होते. दिनांक आठ एक दोन हजार चोवीस पासून रात्री बारा वाजता बेटाईम लोड शूटिंग घेतला जात आहे. शेतकऱ्यांना रात्र दिवस शेतात राहून सुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निसर्गा राजाची सुनामी संकट शेतकऱ्यांचा पिक्च सोडायला तयार नाही. एकीकडे राजकारणी नेते मंडळी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत अनेक प्रकारचे आश्वासन शेतकऱ्यांना दिली जातात. पण प्रत्यक्षात मात्र दिलेली आश्वासने हवेतच पोकळी राहतात. शेतकऱ्यांचा आलेला घास महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे हिरावून घेतल्या जात आहे असल्याची जनसामान्य शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. महावितरणच्या उपअभियंताला घ्यावा घालून या फिडरवरील सरपंच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी शासकीय विश्रामगृहात महावितरणच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावून ही शेतकऱ्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश वितरण कंपनीला दिले .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp