Saturday, September 14, 2024
Homeताज्या घडामोडीअखेर सस्ती येथील कांदा व्यापाऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू

अखेर सस्ती येथील कांदा व्यापाऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगांव दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ :- वाडेगाव – पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव ते कळबेश्वर दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सस्ती येथील व्यापारी गँभिर जखमी होऊन खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान बुधवार पहाटे ३ वाजता मृत्यू झाला.

पातूर तालुक्यातील सस्ती येथील डॉक्टर अमर सुरवाडे व सागर सुरवाडे यांचे वडील भीमराव सुरवाडे वय ६० हे शुक्रवार १ सप्टेंबर रोजी एम एच ३० बी पी २४०१ या दुचाकीने अकोला वरून एक व्यवहार करून परत सस्ती कडे येत असताना गोरेगाव नजीक अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यामध्ये ते गँभिर जखमी झाले होते.यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता.त्यामुळे ते कोमात गेले होते.परंतु त्याच्या शरीराने साथ न दिल्याने खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुलं,एक मुलगी सुना ,नातवंड ,भाऊ पुतणे असा आप्त परिवार आहे.या घटनेने परिसरात दुःखाचे वतातवर पसरले होते. संबधित पोलिसांनी अज्ञात वाहनधारक वर योग्य कारवाई करण्यात यावी.तसेच अज्ञात वाहन धडक देणारा इसम पिंपळखूटा येथील रहिवासी असल्याचे दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरू होती.तरी पोलीस प्रशासनाने सबधितांवर चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी.व सुरवाडे परिवाराला योग्य न्याय देण्यात यावा अशी मागणी परिवरा कडून करण्यात आली आहे.(AKOLA NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp