अकोला न्युज नेटवर्क दिनांक २५ जुलै :- गांधीग्राम येथील चार कोटीच्या पुलाचा मुद्दा पुन्हा वादाच्या भवरात आला आहे पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाले असून प्रशासनाने योग्य कारवाई करावी अन्यथा उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वकील सैनिकांनी केला आहे.
अकोला पूर्व मतदार संघात बांधण्यात आलेल्या गांधीग्राम येथील चार कोटीच्या पुलासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे यावेळी झालेल्या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी प्रशासनाकडून न्यायक भूमिका मांडण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे गांधीग्राम येथील नुकताच बनवण्यात आलेल्या पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे या पुलाचा उपयोग अकोला ते अकोट मार्ग सुरळीत होण्याच्या हेतूने करण्यात आला होता पण पहिल्याच पावसामध्ये या पूलाने आपला दम सोडला आहे या पुलाची अवस्था बघता नागरिकांच्या वाहतुकीसाठी धोक्याचे ठरत आहे तसेच हा पूल चार कोटी चा म्हणून संबंधित प्रशासन गाजावाजा करत आहे पण अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या चार कोटीच्या पुलाच्या कामाविषयी आक्षेप नोंदवून या पुलाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे यावर प्रशासनाने योग्य ते कारवाई करावी अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदनद्वारे सूचित केले आहे