अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक ४ सप्टेंबर :- हिंदू संस्कृतीमधील पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी निमित्त बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम पिंजर येथे कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा केला गेला. कावड यात्रेत श्री. कपिलेश्वर कावड मंडळ,या मंडळांसह गुलालशेष कावड मंडळ आणि कावडधारी युवकांनी सहभाग घेतला होता. “हर हर महादेव” च्या गजराने पिंजर नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
पिंजर बॉयपासून कावड यात्रेस प्रारंभ होऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत कावड यात्रा निघाली. श्री कपिलेश्वर महादेव संस्थान मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला. शिवभक्तांसाठी महादेव सवस्थान मार्फत ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सदर कावड यात्रा दरम्यान गावातील, सरपंच, अशोकराव लोण्रागे, पत्रकार प्रदीप गावंडे, तंन्टामुक्ती अध्यक्ष संतोष इंगळे, अविनाश डोंगरदिवे, सभापती पती संजय मानतकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील ताठे,व गावातील पंचमंडळी यांनी मान्यवर मंडळींनी, तसेच गावकऱ्यांनी महादेवाचे पूजन केले. तसेच पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजुभाऊ वानखडे, चंद्रशेखर गोरे, भिकासिंग जाधव, रोशन पवार, नामदेव मोरे, सुभाष उघडे, श्रीकांत आजलसांडे,व पोलिसांनी कावड यात्रा दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.