Saturday, September 14, 2024
Homeताज्या घडामोडीहर हर महादेव च्या गजराने दुमदुमली लोहारा नगरी

हर हर महादेव च्या गजराने दुमदुमली लोहारा नगरी

अकोला न्यूज नेटवर्क, देशमुख हिंदू संस्कृत, प्रतिनिधी शाहबा दिनांक २२ ऑगस्ट २०२३ :-श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा उरळ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त लोहारा शाहबाज देशमुख हिंदू संस्कृतीमधील पवित्र श्रावण महिन्याच्या प्रथम सोमवार निमित्त बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा केला गेला. कावड यात्रेत श्री. महाकालेश्वर कावड मंडळ, या मंडळांसह शिवभक्त आणि कावडधारी युवकांनी सहभाग घेतला होता. “हर हर महादेव” च्या गजराने लोहारा नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

लोहारा येथील बस स्टॉप येथून कावड यात्रेस प्रारंभ होऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत कावड यात्रा निघाली. श्री महादेव संस्थान मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला. शिवभक्तांसाठी महादेव सवस्थान मार्फत ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सदर कावड यात्रा दरम्यान महादेव सावस्थां व लोकप्रतिनिधी, रुपेश ठाकूर नेणेश्वर वावरे घनश्याम बकाल यांनी मान्यवर मंडळींनी, तसेच गावकऱ्यांनी महादेवाचे पूजन केले. तसेच कवाड यात्रा अध्यक्ष महादेव घावट अनिकेत ठाकूर उरळ ठाणेदार गोपाळ ढोले बिट जमदार राजा भाऊ बचे पोलीस पाटील शरद बकाल यांचा महादेव स्वस्थान च्या पद अधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सुवागत केले या वेळी उरळ पोलिसांनी कावड यात्रा दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp