अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-प्रसिद्ध लोकगायिका फरमानी नाज यांच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी चाकूनं भोसकून तरुणाची हत्या केली. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. खुर्शीद असं मृत तरुणाचं नाव असून तो गायिका फर्मानी नाझ यांचा भाऊ आहे. खुर्शीद १९ वर्षांचा होता.खुर्शीदची हच्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. सध्या पोलिसांकडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहम्मदपूर माफी गावात ही घटना घडली. गेल्या शनिवारी बाईकवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी खुर्शीदची चाकूनं वार करुन हत्या केली. आरोपींनी खुर्शीदवर चाकूनं अनेक वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांना रुग्णालयात दाखल केलं.

मात्र उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेवर पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगलं आहे. खुर्शीद मजुरी करुन उदरनिर्वाह चालवायचा. ‘खुर्शीद नमाज अदा करुन येत होता. गावापासून दीडशे मीटर दूरवर ३ जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. तिघेही दुचाकीवरुन आले होते. त्यांनी खुर्शीदवर चाकूनं वार केले. त्याच्या पोट, मान आणि कमरेवर वार करण्यात आले,’ अशी माहिती सरपंच परवेझ सिद्धीकी यांनी दिली. खुर्शीद हा लोकगायिका यांचा चुलत भाऊ होता. फरमानी यांनी गायलेलं गाणं यूट्यूबसह सोशल मीडियावर प्रचंड गाजलं.

त्यानंतर देवबंदकडून त्यांच्याविरोधात फर्मान काढण्यात आलं. फरमान यांची कृती इस्लाममध्ये हराम असल्याचं देवबंदनं म्हटलं. त्यावर कलाकाराला धर्म नसतो, असं उत्तर फरमानी नाझ यांनी दिलं. त्यांनी इंडियन आयडॉलच्या १२ व्या हंगामात सहभाग घेतला होता. त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सची संख्या ४५ लाख इतकी आहे.(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!