अकोला न्युज नेटवर्क दिनांक २२ जुलै :-हिवरखेड परिसरात 21 जुलैच्या मध्यरात्रीपासून अतिवृष्टी झाली असून ढगफुटी सदृश्य पाऊस 22 तारखेच्या सकाळपर्यंत सुरू आहे या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे काल रात्री पासून मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केले असून येथील शेतकरी मनोज किसनराव खनपटे यांची घराची भिंत पडली तर गौरव भुडके यांच्या गोडाऊन ची भिंत सुद्धा पडली आहे. एकीकडे पाच वर्षांपासून पडलेल्या लेंडी नाल्यावरील दत्त भारती मंदिर नजीकच्या पाच वर्षापासून पडलेल्या पुलाचे काम सुरु करण्याची जाग लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला पाच वर्षानंतर आली आहे. सदर पुलाचे काम सुरू होऊन पर्यायी रस्त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड हेलपाटे सहन करावे लागत आहेत एवढेच नाही तर सदर पुलाचे काम करण्यासाठी पाण्याचा प्रवाह बाहेरून वळविण्यात आला ज्यामुळे सार्वजनिक शौचालयाच्या खालून पूर्ण भरती वाहून गेलेली आहे. पुलाच्या आजूबाजूने पूर संरक्षण भिंत सुद्धा उभारण्यात आलेली नाही त्यामुळे आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे.