Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीकारंजा येथे समता चित्ररथाचा शुभारंभ समाज कल्याण योजनांची माहिती मिळणार

कारंजा येथे समता चित्ररथाचा शुभारंभ समाज कल्याण योजनांची माहिती मिळणार

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४:- समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती नागरिकांना आणि लाभार्थ्यांना व्हावी आणि या माहितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय,वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२३ -२४ या वर्षात समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण निवडक योजनांचा प्रसार प्रसिद्ध करण्यासाठी समता चित्र तयार केला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ आज ८ फेब्रुवारी २०२४ रोजी कारंजा तहसील कार्यालय येथे करण्यात आला. चित्ररथाला कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी हिरवा झेंडा दाखविला.

समता चित्ररथावर कन्यादान योजना, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, दुभत्या जनावरांचे गट वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींसाठी निवासी शाळा या महत्त्वपूर्ण योजनांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी कोणत्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे,लाभाचे स्वरूप आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा याबाबतची देखील माहिती दिली आहे.

तसेच समता चित्ररथामध्ये असलेल्या ऑडिओ सिस्टीमवरून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींसाठी निवासी शाळा, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुलामुलींसाठी शासकीय वस्तीगृहे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना,कन्यादान योजना,अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,शेळीगट वाटप योजना, दुभत्या जनावरांचे गट वाटप व रमाई आवास योजनांची जिंगल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे.त्यामुळे अधिक योजनांची माहिती ऐकण्यास देखील मिळणार आहे. समता चित्ररथ जिल्ह्यात २० दिवस फिरणार असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात निवडक गावात संबंधित लाभार्थ्यांच्या वस्तीत जाणार आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना व नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती मिळून भविष्यात त्या योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!