Sunday, December 8, 2024
Homeताज्या घडामोडीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा; पंतप्रधान मोदींना निमंत्रण

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा; पंतप्रधान मोदींना निमंत्रण

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:-अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात येत्या जानेवारीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण पाठविले आहे, असे न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधान मोदींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पत्र पाठविले आहे. पंतप्रधानांनी या सोहळ्याला हजेरी लावल्यास जगभर देशाची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असे या पत्रात म्हटले आहे. निमंत्रण पत्रात सोहळ्याची तारीख १५ ते २४ जानेवारी यादरम्यानची दर्शविण्यात आली आहे; परंतु, पंतप्रधानांच्या उपलब्धतेवर तारीख अवलंबून असेल, असेही राय यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी १० हजार लोकांना निमंत्रण पाठविले जाणार आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp