Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीकीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल पाहा नेमकं काय आहे प्रकरण

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल पाहा नेमकं काय आहे प्रकरण

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इंदोरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय.महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून सत्र न्यायालयात खटला चालणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषय तारखेला केल्यावर मुलगी होते, या वक्तव्यामुळे निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराजांच्या या वक्तव्यावरून अहमदनगरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऑड.. रंजना गवांदे आणि ऑड.. जितेंद्र पाटील यांनी याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला होता. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करत संगमनेर कोर्टात खटला चालवण्याचे निर्देश दिले होते.औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. इंदोरीकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून आता सत्र न्यायालयामध्ये आता परत खटला चालणार आहे.

निवृत्ती महाराजांवर कोणता आरोप होतो.राज्यभर निवृत्ती महाराज इंदोरीकर प्रसिद्ध असून त्यांची कीर्तनाची शैली बहुतेकांना आवडते. खास करून ग्रामीण भागामध्ये त्यांच्या कीर्तनाची क्रेज पाहायाल मिळते. सोशल मीडियावर त्यांच्या कीर्तनाच्या अनेक क्लिप व्हायरल होतात. इंदोरीकरांवर आरोप होतो की, ते आपल्या कीर्तनामध्ये महिलांचा अपमान करताना करतात, त्यांचा बोलण्याचा कल महिलांना उद्देशूनच असतो.महिलांबाबत इंदोरीकरांची वादग्रस्त शेरेबाजी
“पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे.पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे.नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात,अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?
(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp