Saturday, September 14, 2024
Homeताज्या घडामोडीएलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :-व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा भारतीय तेल कंपन्यांनी १ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किंमती अपडेट केल्या आहेत.दरम्यान, या किंमतींमुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत १०० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी एलीपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ९९.७५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. केवळ घरगुती गॅसच्या किमतीतच नाही तर काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बराच काळ बदल झालेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp