अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १६ ऑगस्ट २०२३:- आज सकाळच्या सुमारास अकोल्यातील एका महिला पोलीस कर्मचारीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन आतर्गत येणाऱ्या गीता नगर स्थित बेला अपार्टपमेंट येथील फ्लॅट मध्ये एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास केला असता वृषाली सरगे असे या महिलेचे नाव असून सदर महिला ही पोलीस विभागात कर्मचारी पदावर कार्यरत होती.
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या 36 वृषाली सरगे यांनी अचानक असे पाऊल उचल्याने पोलीस खात्यात दुःख व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुतदेह सर्व विच्छेदनासाठी अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले दरम्यान वृषाली यांच्याजवळ एक सुसाईड नोट आढळून आली, त्यामध्ये तिने म्हटले आहे की पतीच्या निधनानंतर आयुष्यात आज एकटी राहिली आहे. त्यात मूल-बाळ पण नाहीये, जगावं तर कोणासाठी? त्यामुळे आज माझ्या इच्छेने ‘मी’ आपलं जीवन संपवत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत म्हणजे जबाबदार ठेवू नका, हे सर्व काही स्वतः करीत आहे, असं सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितिन लेव्हरकर यांनी दिली आहे
(AKOLA NEWS NETWORK )