Sunday, November 10, 2024
Homeब्रेकिंगअकोल्यातील मोठ्या मोर्णा नदीच्या पुलाखाली तरुणाचा

अकोल्यातील मोठ्या मोर्णा नदीच्या पुलाखाली तरुणाचा

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ :-अकोल्यातील मोठ्या मोर्णा नदीच्या पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढल्याने उडाली खळबळ अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या मोर्णा नदीत एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबल उडाली भर दुपारी हा मृतदेह नदीच्या पाण्यावर तारंगताना दिसून आल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली होती

जुना शहरातील मोर्णा नदीत आज दुपारी दोनच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली मोराणा नदीच्या लोखंडी पुला खाली नदीपात्रात आज दुपारी एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने बघ्यांची एकच गर्दी या ठिकाणी जमली असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. सदर घटनेची माहिती जुने शहर पोलीस स्टेटीन ला मिळताच ताफा घटनास्थळी दाखल झाला. संत गाडगे बाबा पथक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अखेर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचा पंचनामा करण्याच्या दरम्यान या मृत व्यक्तीच्या खिशात आधारकार्ड मिळून आले असून शेख आसिफ शेख हुसेन रा. गौलीपुरा देगरस जि. यवतमाळ असे नमूद होते आधार कार्ड वरून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला, पुढील तपास जुने शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp