अकोला न्युज नेटवर्क ब्युरो राहुल सोनेने प्रतिनिधी वडेगाव दिनांक ४ सप्टेंबर :– रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी भाचा आईसोबत आला होता. सकाळच्या सुमारास गावानजीक वाहत असलेल्या निर्गूना नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे उघडकीस आली आहे. मामाच्या घरी भाच्याचा मृत्यू झाल्याची वार्ता समजात संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दिग्रस बु येथील संदीप प्रकाश गवई यांच्या घरी रक्षाबंधनासाठी त्यांची बहिण संपूर्ण परिवारासह आली होती. रविवारी शाळेला सुटी असल्याने दोन्ही भाचे सोबत होते. सकाळच्या सुमारास रत्नदीप सुनील इंगळे (वय १८) व त्याचा भाऊ हे मित्रांसोबत निर्गुणा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पुला नजकीच्या डोहात रत्नदीप हा अडकला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना त्याचा पाण्यात बुडत होता. त्याचा भाऊ त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला परंतु अचानक भावाच्या हातातला सुटल्याने पाण्यात खाली गेला तो पुन्हा वर आला नसल्याचे उपस्थित ग्रामस्थनी सांगितलं आहे.त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.त्याला उपस्थित पोहणाऱ्या युवकांनी शोधून बाहेर काढले असता तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात नेले परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लहान भावाने केला वाचविण्याचा प्रयत्न
संदीप गवई यांचे दोन्ही भाचे मित्रांसोबत पोहण्यासाठी निर्गूणा नदीपात्रात गेेले होते. यावेळी रत्नदीप इंगळे हा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या लहान भावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू तो डोहात अडकल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.(AKOLA NEWS NETWORK)