अकोला न्युज नेटवर्क ब्युरो राहुल सोनोने प्रतिनिधी वडेगाव दिनांक ४ सप्टेंबर :- वाडेगाव -पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव ते कळबेश्वर दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सस्ती येथील व्यापारी गँभिर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळलेल्या माहिती नुसार पातूर तालुक्यातील सस्ती येथील भीमराव सुरवाडे वय ६० हे शुक्रवार १ सप्टेंबर रोजी एम एच ३० बी पी २४०१ या दुचाकीने अकोला वरून एक व्यवहार करून परत सस्ती कडे येत असताना गोरेगाव नजीक अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यामध्ये ते गँभिर जखमी होऊन दुचाकीने अतोनात नुकसान झाले आहे.यामध्ये यांच्या दुचाकीने पण नुकसान झाल्याची माहिती आहे.यांना तत्काळ खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.याबाबत संबधित पोलिसांनी चॉकशी करून अज्ञात वाहनधारक वर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.(AKOLA NEWS NETWORK)