अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दोन वकिलांमध्ये खुर्चीवरून वाद झाला. यात एका नवोदित वकिलाने वरिष्ठ वकिलाच्या डोक्यात खुर्चीच मारली. यामुळे ज्येष्ठ वकिलाला गंभीर दुखापत झाली. या वकिलाची रक्तबंबाळ परिस्थितीतील काही छायाचित्रेसुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने विधी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी दुपारी पाऊणच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीतील बार रुम क्रमांक ६२४मध्ये घडली. संबंधित वरिष्ठ वकील या बार रुममध्ये बसतात. बारतर्फे त्यांना बसण्यासाठी (ANN NEWS)अधिकृत खुर्ची देण्यात आली आहे. ते त्यांच्या एका प्रकरणात युक्तिवादासाठी कोर्ट रुममध्ये गेले असता या बार रुममध्ये एक अन्य वकील आला. तो बार रुममध्ये बसत नाही. तो वरिष्ठ वकिलापेक्षा वयाने लहान असून तो क्षेत्रातही तुलनेने नवा असल्याचे कळते. तो त्यांच्या खुर्चीवर बसला. संबंधित वरिष्ठ वकील तेथे आले. तरुण वकील आपल्या जागेवर बसलेला असल्याचे दिसल्याने त्यांनी त्याला तेथून उठण्यास सांगितले. यावेळी तो एक अर्ज लिहीत होता व ते तेवढा लिहून झाल्यावर आपण लगेच उठू, असे या तरुण वकिलाने ज्येष्ठ वरिष्ठाला सांगितले,

असे कळते. यावरून वरिष्ठ वकील चिडले व त्यांनी तरुण वकिलाला शिवीगाळ केली व त्याच्या श्रीमुखातही भडकविल्याचे काही सूत्रांकडून कळते. यामुळे चिडलेल्या तरुणाने वरिष्ठाच्या डोक्यावर त्यांचीच खुर्ची मारली. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांचे रक्तबंबाळ स्थितीतील छायाचित्रेसुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाली. उपस्थितीतांनी वरिष्ठ वकिलाला तातडीने एका खासजी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची जखम टाक्यांनी शिवल्याचे समजते. मात्र, अखेर या दोघांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटविले. त्यामुळे वरिष्ठ वकिलाने पोलिस तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. दोन्ही बाजूंनी वाद मिटवल्यानं या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. राजकारण्यांमधील खुर्चीची लढाई अनेकदा दिसत असते. पण, कोर्टातील खुर्चीची लढाई आज पाहायला मिळाली.

(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!