अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर दक्षिण गोव्यात काणकोण येथे श्रम धाम उपक्रमाअंतर्गत गरीब लोकांना घरे बांधून देत आहेत. अलिकडेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते काही घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरीब लोकांना हक्काचा निवारा (ANN NEWS) उपलब्ध होत आहे.दक्षिण गोव्यात यावेळी झालेल्या पावसात विविध ठिकाणी पडझड झाल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशाच एका कुटुंबाचा निवारा ध्वस्त झाल्याने त्यांच्यासाठी तवडकरांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
सावर्डे मतदारसंघातील एका गरीब कुटुंबाचे घर पावसाळ्यात कोसळले. नुकतेच या घराची पाहणी आमदार गणेश गावकर आणि सभापती रमेश तवडकर यांनी केली. या कुटुंबाला पुन्हा घर बांधून द्यायचे आहे. श्रमधाम योजनेअंतर्गत या घराची बांधणी केली जाणार असल्याचे तवडकरांनी सभागृहात माहिती दिली. घर बांधणीसाठी आमदारांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन तवडकरांनी सर्वांनी केली.
तवडकरांनी सभागृहात केले अवाहन
सभापती रमेश तवडकरांनी सर्व आमदारांनी या गरीब कुटुंबाचे घर पुन्हा बांधण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन केले आहे. श्रम धाम योजनेअंतर्गत हे घर बांधले जाईल असे सभापतींनी स्पष्ट केले.(AKOLA NEWS NETWORK )