अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४:- अकोट येथे काही दिवसापूर्वी दोनदेशीकट्टा जप्त करण्यात आले होते. याप्रकरणातील तपासात स्थानिक गुन्हे शाखा अकोला व अकोट पोलीस यांनी ६ फेब्रुवारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथुन तिन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे कडुन एक देशी कटटा, २ मॅक्झीन व ५ जिवंत काडतुस जप्त करण्यात केले. पोलीस स्टेशन अकोट शहर येथे १६ जानेवारी रोजी दोन युवकांजवळून दोन दोन देशी कट्टे व ९ काडतुस जप्त केले होते.
या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी अजय तुलाराम देठे, प्रफुल विनायक चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी पोलीस तपासात दिलेल्या माहितीवरून अकोट तालुक्यातील नेव्हरी येथील मूळ रहिवाशी व सध्या पुणे येथे राहत असलेल्या शुभम रामेश्वर लोणकर याला पोलिसांनी अटक केली. त्यांचे आंतरराष्ट्रीय टोळी सोबत संबंध असल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करत असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथून या गुन्हयात पुढील कायदेशिर तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीसअधीक्षक अभय डोंगरे, अकोट सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके, प्रभारी पोलीस निरीक्षक अकोट शहर संजय खंदाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोउपनि राजेश जवरे, पोउपनि अख्तर शेख, पोहेका उमेश पराये, सुलतान पठान, चंद्रप्रकाश सोळंके, वसीमोद्दीन, सागर मोरे, विशाल हिवरे, मनिष कुलट, मोहम्मद अमिर यांनी केली.