अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :-पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत पातुर नंदापूर परिसरात देशी विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती ठाणेदार राहुल वाघ यांना मिळाली तातडीने पथक पाठवून दारू विक्री करणाऱ्या आरोपीस पिंजर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
पिंजर पोलिस पातुर नंदापूर भागात पेट्रोलिंग करत असताना पातुर नंदापूर परिसरात एक इसम दुचाकीवर देशी विदेशी दारूची अवैधरित्या देशी दारूची विक्री करित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करून आरोपी.शिव शंकर मात्रे राहणार पातुर नंदापूर याला ताब्यात घेतले सदर इसम पातुर नंदापूर परिसरात अवैधरित्या मोटारसायकल एम एच.३०.बी ई.३६५१ या गाडीवर विदेशी व देशी दारूची अवैध विक्री करित होता. पोलिसांनी १७ हजार५०० रुपयांचा देशी दारूचे ५२० नग , विदेशी दारूचे १० नग,एम एच, ३० बी ई,३६५१ क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कानडी बीटचे इंचार्ज राजु भाऊ वानखडे सुमेध मोहोड यांनी केली….