अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० ऑगस्ट २०२३:-अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधून मधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात. उल्कांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा निश्चित असल्यामुळे वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारकासमूहातून काही उल्का अधिक प्रमाणात पडताना दिसतात.

अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाशप्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार असल्याची माहिती, ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. १२ व १३ ऑगस्टला आकाशात विविधरंगी रोषणाई स्विफ्ट टटल या धुमकेतूंच्या अवशेषातून बघता येईल. हा विविधरंगी प्रकाश उत्सव मध्यरात्रीनंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समूहातून आरंभ होईल.

याचवेळी गुरु ग्रह आकाश मध्याशी सोबतीला असेल. ताशी ६० ते १०० उल्कांचे दर्शन सर्वसाधारण दर ताशी ६० ते १०० या प्रमाणात उल्का तुटताना दिसतील. जसजशी रात्र संपायला लागेल तसतसा उल्का वर्षावाचा वेग वाढता असेल. हा नयनरम्य नजारा अंधाऱ्या भागातून झोपलेल्या स्थितीत ययातीकडे नजर ठेवून नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.
(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!