अकोला न्यूज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-झाशीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय मुलाने आपल्या आई-वडिलांची लोखंडी तव्याने मारून हत्या केली. हत्या केल्यानंतर (ANN NEWS) त्याने बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली, कपडे बदलले, मग खोलीत जाऊन आरामात बसला. हत्येची माहिती मिळताच पोलिस पोहोचले असता आरोपी मुलगा कॉटवर बसलेला दिसला.
पोलिसांना पाहून तो हसू लागला. पोलिस अधिका-यांनी विचारले तर, आधी काही बोलला नाही. नंतर म्हणाला होय, मी मारले आहे. अंकित असे आरोपीचे नाव आहे. बहिण नीलमने सांगितले की, भावाला पब्जीचे व्यसन लागले होते. त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडिलांनी खेळू दिले नाही म्हणून अनेकदा भांडण व्हायचे. या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे.
३ बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ
ही घटना नवाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिचोरे येथे घडली. लक्ष्मी प्रसाद (५८) हे पत्नी विमला(५५) यांच्यासोबत येथे राहत होते. पालरा येथील सरकारी शाळेत ते मुख्याध्यापक होते. मुलगा अंकित(२६) त्यांच्यासोबत राहत होता. तीन मुलींपैकी मोठी मुलगी नीलम आणि सुंदरी यांचे लग्न झाले होते. नीलमचे सासरचे घर शेजारच्या कॉलनीत आहे. लहान मुलगी शिवानी ओराई येथे शिकत आहे.(AKOLA NEWS NETWORK)