Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीअकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-Akola Railway News: गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २९ व ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. अप व डाऊन मार्गावर आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.

मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस येत्या ४ ऑगस्ट ते २९ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवार व रविवारी पुणे येथून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परभणी, हिंगोली या मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी (शनिवार व सोमवार) दुपारी २.५५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होणार आहे. गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस येत्या ५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवार व सोमवारी अमरावती वरून ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होऊन बडनेरा-मूर्तिजापूर मार्गे त्याच दिवशी रात्री २१.२० अकोला स्थानकात दाखल होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी (रविवार व मंगळवार) दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!