अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :- उंबरे येथील घटनेच्या निषेधार्थ व लव्ह जिहाद विरोधात देशभरात कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरीत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले होते. राहुरीतील वायएमसीए मैदानावर हिंदू समाज मोठ्या संख्येने घोषणा देत दाखल झाले. यावेळी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.तालुक्यातील ग्रामिण भागातून हिंदू समाज भगव्या टोप्या व हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत घोळक्याने येऊन मोर्चात सहभागी झाले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे 45 हजार ते 50 हजार हिंदूंची संख्या असणारा शुक्लेश्‍वर चौकातून छत्रपती शिवाजी चौक ते शनिमंदिर चौक मार्गे जुन्या ग्रामिण रूग्णालयासमोर या मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपिठावरील आ. नितेश राणे, श्रीसंत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज, हर्षदा ठाकूर, एकलव्य संघटनेचे योगेश सुर्यवंशी, श्रीराम सेनेचे सागर बेग यांनी आपल्या भाषणातून घटनेचा चांगला खरपूस समाचार घेतला..

नितेश राणे बोलताना म्हणाले, देशाच्या इतिहासात हिंदूंनी कधीच प्रथम दंगल घडविली नसून हिंदू समाज कधीच कुण्याच्या अंगावर जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सविधानाचे कायद्यांचे पालन करतो. हिंदूकडून अन्य धर्माच्या लोकांना कधीच त्रास होत नाही. प्रत्येकाने आपला धर्म संभाळावा व आम्हाला हिंदू म्हणून या देशात सुखाने जगू द्यावे.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहुरी शहरातील काही धार्मिक स्थळांच्या आसपास पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच या मोर्चासाठी राहुरी पोलीसांबरोबर अनेक शिघ्र कृतीदलाचे विशेष पथके ही तैनात करण्यात आले होते. मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेऊन होते. जय श्रीरामाच्या घोषणांनी राहुरी शहर दुमदुमून गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिनाथ महाराज दुशिंग यांनी तर सुत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!