अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जुलै :- अकोला गायगावला जोडणाऱ्या नाक्यावरून पाणीच पाणी वाहतूक विस्कळीत अकोला शहरात काल रात्रभर पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाले वाहू लागले असल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्याना पूर आल्याने भौरद ते अकोला रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दोन दिवसाच्या उघडीप नंतर अकोला शहरा सह जिल्ह्यात काल रात्री पासून दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पाऊस सुरु असल्याने शहराच्या आसपास असलेले नदी नाले वाहू लागले आहेत. अकोला ते गायगाच ला जोडणाऱ्या मार्गांवर असलेल्या भौरद येथील नाल्यावरून पाणी वाहू लागल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचं रस्त्यावर गायगाव येथे पेट्रोल चा डेपो असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या टँकर चालकांना अलोकडेच थांबावे लागले तर काही नगरीक वाहत्या पाण्यातून मार्ग काढतांना दिसून आले हाच रस्त्या शेगावला देखील जात असल्याने या रस्त्यावर नियमित रहदारी असते दर वर्षी या नाल्याना पूर येत असल्याने येथील अकोल्याशी संपर्क तुटणे ही दरवर्षीची बाब असून देखील प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या नाल्यावरील पुलाची उंची वाढवून याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.