अकोला न्युज नर्टवर्क ब्युरो दिनांक ५ ऑगस्ट २०२३ :- जुने शहरातील किल्ला परिसर पोळा चौकात असलेले एका रोडचे खोदकाम सुरू असताना जुने अवशेष सापडल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र प्रत्यक्षात कुदळ, फावडे आढले असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
जुने शहरातील किल्ला परिसर पोळा चौक परिसरात असलेल्या एका रोडचे रुंदीकरण करण्यासाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. यादरम्यान खोदकाम करताना खोडकामात कुदळ, फावडे, टोपले आढळून आल्याने एकच आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जवळच किल्ला असल्याने जुने शहरात खोडकामात जुने अवशेष सापडल्याची अफवा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या घटनेची जुने अवशेष पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात गर्दी सुरू केली होती.
मात्र प्रत्यक्षात रस्त्या खोदकाम करताना कुदळ, फावडे, टोपले सापडल्याचे वास्तव होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी नागरिकांची गर्दी कमी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन, पोलिसांनी केले आहे.