अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :- समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासूनचा हा चर्चेचा विषय राहिला आहे. आधीच समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासूनचा हा चर्चेचा महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर अवघ्या सहा महिन्यांमध्ये खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. पडण्यास सुरुवात झाल्याने अपघाताची शक्यता आणखी बळावली आहे.सहा महिन्यातच समृद्धी महामार्गावर खड्डे
हजारो कोटींचा खर्चकरुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर खड्डे
जागतिक दर्जाचा तंत्रज्ञान वापरून आणि जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघे सात महिने उलटले आहेत. मात्र, उद्घाटनानंतर सात महिन्यातच समृद्धी महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
हजारो कोटींचा खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर खड्डे
जागतिक दर्जाचा तंत्रज्ञान वापरून आणि जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघे सात महिने उलटले आहेत. मात्र, उद्घाटनानंतर सात महिन्यातच समृद्धी महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळील इंटरचेंजजवळ एका पुलावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे आजच राज्याच्या विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताची चर्चा झाली असतानाच समृद्धीवर खड्डे पडत असल्याने समृद्धी महामार्गावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय ?
- 701 कि.मी.चा मार्ग
- 17 तास प्रवासाचे अंतर 7 तासांवर येणार
देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग, 11 लाख वृक्ष दोन्ही बाजूंनी असणार
- राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ
- प्रकल्प खर्च : 55,355 कोटी
- 10 जिल्ह्यातील, 26 तालुक्यातील 391 गावातून जाणार
- सहा पदरी असणार मार्ग / 150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता
- नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ला लोकार्पण करणार
उर्वरित 181 कि.मी. पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार
- 14 जिल्हे पोर्टने जोडले जाणार
प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार
शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार
- या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा / 20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार
- 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार