ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 29 जुन 2023 गुरुवार राहुल सोनोने वाडेगाव :- (शाहिद जवान) पातूर तालुक्यातील तुंलगा बु येथील (११९ इंजिनिअर रेजिमेंट) झासी येथे सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक सुरेश मोतीराम महल्ले वय ४० कर्तव्यावर असतांना मंगळवार रोजी हृदय विकाराने झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना तुंलगा येथील पोलीस पाटील अशोक तायडे व त्यांचे मित्र गजानन ठाकरे यांनी माहिती दिली आहे…
तुंलगा बु येथील शेतकरी कुटूंबामधील असलेले सुरेश मोतीराम महल्ले हे वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे २००३ साला मध्ये देशसेवेत रुजू झाले होते. वीस वर्ष सेवा देऊन झाले असून त्यांच्या मागे आई व पत्नी, एक मुलगा १० वर्ष,तर दुसरा मुलगा ८ वर्षाचा असून परिवार सुद्धा त्यांच्या सोबत होता.उद्या शुक्रवार दिनांक ३० जून रोजी राहत्या घरी तुंलगा बु येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. असे सरपंच खुशाल तायडे यांनी सांगितलं आहे..