Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बंड तुपकर नाराज राजू शेट्टी...

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बंड तुपकर नाराज राजू शेट्टी काय करणार?

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील बंड होणार का अशी शंका निर्माण झाली आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून याबद्दल चर्चा सुरू आहे.आधी शिवसेनेमध्ये नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील बंड होणार का अशी शंका निर्माण होतीय. कारण बुलढाणा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठीं बद्दल दर्शवलेली नाराजी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाची मालमत्ता नाही असे केलेले वक्तव्य यामुळे पुन्हा रविकांत तुपकर यांची राजू शेट्टीवर असलेली नाराजी पुढे आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारी संघटना म्हणून राज्यातच काय देशात ओळख…राजू शेट्टी यांनी सुरू केलेली ही चळवळ आज संपूर्ण राज्यात पसरली असून अनेक कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेले. तर राजू शेट्टी खासदार देखील झाले. एका बाजूला राजू शेट्टी खासदार होऊन पक्ष आणि संघटना पुढे वाढवत असताना त्यांच्याच तालमीत तयार झालेले बुलढाण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आता बंडाच्या तयारीत आहेत असे वाटू लागलें आहेत. कारण नुकताच राजू शेट्टी यांचा झालेला पूरग्रस्त पाहणीचा दौरा आणि यावेळी रविकांत तुपकर यांची असलेली अनुउपस्थित बरच काही सांगून गेले… अशातच काल रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात तत्काळ कार्यकर्त्यांची बैठक बोलावत राजू शेट्टी यांचा नावाचा उल्लेख टाळत बुलढाणा लोकसभेसाठी तयार राहण्याचा आणि आपल्याला कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत नाव न घेता राजू शेट्टींकडे केलेला इशारा यामुळे स्वाभिमानीत बंडाच चिन्ह दिसत आहे.

काल बुलढाणा मध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली रोखठोक आणि आक्रमक भूमिका मांडली त्यांनी आपली मनातील खदखद व्यक्त करत आपल्याला पक्षश्रेष्ठीकडून डावलण्याचा प्रयत्न होत आहे.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे आहे. आता महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

तर यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, हा बुलढाणा मधील युवा आघाडी प्रमुख प्रशांत डीक्कर आणि रविकांत तुपकर अश्या आमच्याच दोन नेत्यांमधील वाद आहे. हा वाद मिटवण्यासाठी पक्षाचे शिस्त पालन समितीच्या प्रमुखाना कोर कमिटीचे बैठक बोलवण्यास सांगितले असून या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि दोघांनाही बोलवण्यात येणार असून दोघांच ही काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत. वाद मिटला तर ठीक अन्यथा आम्ही सर्व जण जो निर्णय घेईल हा दोघांसाठी बंधनकारक असेल असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहेत. तसेच पक्षश्रेष्ठी कडून त्यांना डावलण्याचा प्रयत्न प्रयत्न होत असला असता तर रविकांत तुपकर यांच्यावर झालेल्या लाटीचार्ज दरम्यान राज्य कार्यकरणीची बैठक सोडून प्रमुख नेत्यांना बुलढाणाला पाठवलं नसत असेही त्यांनी यावेळी आवर्जून म्हटले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक कार्यकर्त्याची असून स्वाभिमानी मध्ये बंड होणार नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे. तसेच मी स्वतः याबद्दल लक्ष घालून हा वाद मिटवणार आहे असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव शेतकरी प्रश्नावर हात घालत आपला पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या स्वाभिमानी मधील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद आणि बंडाची लागलेली कुणकुण ही राजू शेट्टी यांना आणि स्वाभिमानी पक्षाला न परवडणारी असणार आहे. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बंड होईल का? का राजू शेट्टी यांना वेळीच नाराजी दूर करण्यात यश मिळेल याचे उत्तर काही दिवसात मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp