अकोट ते दानापूर मार्गे हिवरखेड, हिंगणी एस. टी.बस सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी ,शेतकरी व नागरिक यांनी केली आहे .त्याकरिता हिंगणी बुजुर्ग येथील ग्रामपंचायत ने ठराव घेवुन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अकोट येथील डेपो मॅनेजर यांना रीतसर मागणीचे निवेदन सुद्धा दिले आहे. हिंगणी बुजुर्ग व हिंगणी खुर्द येथील शेतकऱ्यांना आपल्या शेती संबधित सर्व खत, बिजवाई घेण्याकरिता हिवरखेड किंवा अकोट बाजारपेठ गाठावी लागते.सर्व रुग्णांना आपली प्रकृति दाखवण्या करिता हिवरखेड किंवा अकोट येथील दवा खाण्यात जावे लागते.तर महत्त्वाचे म्हणजे हिंगणी या गावातील विद्यार्थ्यांना आपल्या पुढील शिक्षणाकरिता हिवरखेड येथील शाळेत जावे लागते ,तर कॉलेज करिता अकोट येथे दररोज ये जा करावी लागते.

हीवरखेड येथे मोठी कपडा मार्केट ,मोठी भाजी ची बाजारपेठ ,किराणा मार्केट व महत्वाचे म्हणजे सर्व बँका हिवरखेड येथेच असल्यामुळे सर्व कामे करण्याकरिता हिंगणी येथील एकदरीत शेकडो चे संख्येत नागरिक आप आपल्या कामानिमित्त हिवरखेड येथे जाणे येणे करतात . येथील विद्यार्थ्यांना हिवरखेड शाळेत जण्या करिता ,अगोदर पायदळ गोरधा फाट्यावर जावून तेल्हारा ते हिवरखेड एस टी बस ची पकडावी लागते ,त्याकरिता तासन् तास बस ची वाट बघावी लागते, बरच्यादा विद्यार्थ्यांना शाळेत पैदल जावे लागते. या सर्व बाबी विचारात घेवून अकोट आगार व्यवस्थापक यांनी याकडे लक्ष देवून ,लवकरात लवकर हिंगणी ते हिवरखेड बस सुरू करावी अशी मागणी,हिंगणी बुजुर्ग येथील सरपंच सौ.सविता मांडवकार,उपसरपंच सचिन कोरडे पाटील ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थि व नागरिक यांनी केली आहे.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!