अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा अधिवेशनात गाजत असतानाच कल्याण पूर्वमध्ये संतापजनक घटना घडली. क्लासवरून घरी परत निघालेल्या एका विद्यार्थिनीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे भररस्त्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर कॅमेऱ्यांना आरोपी व्हिक्टरी साईन दाखवली.क्लासहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोलशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीवरून पाठलाग केला. विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

बुधवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली. अल्पवयीन विद्यार्थिनी क्लास आटोपून घरी परतत होती. विशालने तिचा पाठलाग केला आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन विद्यार्थिनींना त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली.

विद्यार्थिनीने तिच्या पालकांना घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तातडीने आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची victory दाखवली. विशाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. “कल्याणमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न एका सराईत गुन्हेगाराने केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने स्वतःची सोडवणूक करून घेतल्याने ती बचावली. या प्रकरणातील अटक आरोपीवर याआधीचे बलात्कार आणि पोक्सो असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याच समोर आले आहे”, असे त्यांनी ट्विट करून सांगितले.गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि तडीपार असलेला आरोपी मोकाट आहे यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. राज्याचे गृहमंत्री आपण दखल घेऊन आरोपी व संबंधित यंत्रणेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयोगाच्या वतीने करीत आहोत”, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!