Saturday, June 15, 2024
Homeताज्या घडामोडीसेवानिवृत्त शिक्षकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

सेवानिवृत्त शिक्षकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातूर दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४:- पातूर : शहरातील चिरा चौक येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एक इसम मृतावस्थेत असल्याचे आज स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आज दि. 3/02/2024 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या दरम्यान पातूर शहरातील चिरा चौक येथे एक इसम आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याने मृतावस्थेत असल्याचे तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दीली.

सदर माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव मुकुंदराव देऊळगावकर असे असून पातूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या तुळसाबई कावल महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत असून सद्यस्थितीत सेवानिवृत्त असल्याचे निष्पन्न झाले असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.दरम्यान पातूर पोलिसांनी पत्रकार दुले खान व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली काढून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिस करीत आहेत. [Akola Ann News Network]

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!