अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २१ डिसेंबर २०२३ :-अकोल्यात आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी ५,७७५ रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा ६,३०० रुपये प्रति ग्रॅम आहे.तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या आधी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर त्याआधी आज सोने-चांदीचा दर काय आहे ते तपासा. आज २१ डिसेंबर 2023 रोजी सोने- चांदीची किंमत स्थिर आहे. बुधवारी सोन्या- चांदीच्या दरात मोठा बदल झाला होता. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ३८० रुपयांची वाढ झाली होती तर, चांदीच्या दरातही वाढ झाली होती. पण आज मात्र सोने-चांदीचा दर स्थिर आहे. अकोल्यात आज सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्यासाठी ५,७७५ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा ६,३०० रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज सोन्याचा दर काय :- आज 21 डिसेंबर सोन्या- चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नसूने सोने-चांदीचा भाव तेच आहे. आज कॅरेट सोन्याचा भाव ५७,७५० रुपये, १८ ग्रॅम ४७,२५० रुपयांवर आणि २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ६३००० रुपये इतका आहे.
चांदीचा भाव :- आज चांदीचा भावही बुधवार प्रमाणे कायम आहे. बुधवारी मात्र चांदीच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेली नाही. एक किलो चांदीची किंमत 78,500 रुपये आहे. (ann news network) AKOLA