अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :-ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. 1 ऑगस्ट रोजी आकाशात अद्भूत नजारा दिसणार आहे. खगोल प्रेमींना आकाशात सूपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्राचे असे सौंदर्य कधी पाहिले नसेल. 1 ऑगस्टच्या मध्यरात्री आणि 2 ऑगस्टला पहाटे आकाशात ‘सुपरमून’ दिसणार आहे. यामुळे हा सूपरमून पाहण्याची संधी अजिबात सोडू नका. ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणीच पहायला मिळणार आहे.

एका महिन्यात दोन सूपरमून
ऑगस्ट या एका महिन्यात दोन सूपरमून दिसणार आहेत. पहिला सुपरमून हा उद्याच्या 1 ऑगस्टच्या रात्री दिसणार आहे. तर दुसरा सुपरमून हा 30 ऑगस्टला दिसणार आहे.
ऑगस्ट महिन्यात दिसणारा सुपरमून हा आतापर्यंत दिसलेल्या सुपरमून पेक्षा जास्त मोठा असणार आहे असा खगोल तज्ञांचा अंदाज आहे. कारण, 1 ऑगस्टच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे. याआधीचे सूपरमून पेक्षा हा चंद्र अतिशय मोठा दिसणार आहे.ऑगस्ट महिन्यादरम्यान पृथ्वी आणि चंद्राच्या चारही कक्षा 5 डिग्रीच्या अंशाने झुकलेल्या स्थितीत असतात. यामुळेच 1 ऑगस्टला दिसणारा चंद्राला स्टर्जन मून असं म्हटलं जाते. 1 ऑगस्टला चंद्र जास्त चमकदार आणि मोठ्या आकाराचा दिसणार आहे. सूर्यास्तानंतर चंद्र दक्षिण-पूर्व क्षितिजावर येईल तेव्हा देखील अद्भुत असे खगोलीय दृष्य पाहण्याची पर्वणी आहे.

30 ऑगस्टला ब्लू मून दिसणार
30 ऑगस्टला ब्लू मून दिसणार आहे. ब्लू मून ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. चंद्राच्या रंगाशी त्याचा काहीही संबंध नाही. यावेळी ऑगस्ट महिन्यातही दोन पौर्णिमा आहेत, त्यामुळे दुसऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सुपर ब्लू मून दिसणार आहे. यापूर्वी 22 ऑगस्ट 2021 मध्ये असा ब्लूमून दिसला होता.

झिरो शॅडो डे
ऑगस्ट महिन्यात 18 तारखेला झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिवस असणार आहे. जेव्हा सूर्य आपल्या पृथ्वीच्या अगदी वर येतो तेव्हा ही घटना घडते. त्यामुळे कशाचीही सावली तयार होत नाही. शास्त्रज्ञांच्या मते, ही घटना आपल्या देशात कर्क आणि मकर राशीच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये घडते.

शनी ग्रहाभोवतीची कडा स्पष्ट दिसणार
ऑगस्ट महिन्यात 27 ऑगस्टचा दिवसही खूप खास असणार आहे. या दिवशी आपण आकाशात आपल्या डोळ्यांनी शनि ग्रह आणि शनीचे वलय पहायला मिळणार आहे. या दिवशी, शनी ग्रह सूर्याच्या पूर्णपणे विरुद्ध आणि पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना आहे.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!