Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीघरगुती सिलिंडरमध्ये दोन किलो गॅस कमी

घरगुती सिलिंडरमध्ये दोन किलो गॅस कमी

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ११ सप्टेंबर २०२३ :-घरगुती गॅस सिलिंडर देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयसमोरच नागरिकांनी सिलिंडरचे वजन केले. त्यावेळी सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्या वाहनातील ११ टाक्यांचे वजन केले. त्यावेळी तीन टाक्यांमध्ये प्रत्येकी दोन किलो गॅस कमी असल्याचे आढळून आले. आता या प्रकरणाचा तपास सदर बझार पोलिस ठाण्यापर्यंत पोचला.

गॅस सिलिंडर घेऊन आल्यावर शास्त्री नगरातील काही नागरिकांना सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याचा संशय आला. दरम्यान, नागरिकांनी सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे व इतर पोलिस अंमलदाराच्या उपस्थितीत त्या वाहनातील सर्व गॅस टाक्यांचे वजन करण्यात आले. पोलिसांनी सीलबंद टाक्यांमध्ये गॅस कमी असल्याचे पाहून धक्काच बसला. घरगुती सिलिंडरच्या वजनात गोलमाल होत असल्याचा संशय नागरिकांनी पोलिसांसमोर व्यक्त केला. पोलिसांनी ते वाहन जप्त केले असून सिलिंडर टाकीत भरलेला गॅस नैसर्गिकरित्या काही दिवसांनी कमी होतो का, यासंबंधीची विचारपूस संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे होईल. त्यानंतर गुन्हा दाखल होणार की नाही हे ठरेल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

त्यांनी सिलिंडर भरलेले वाहनच संतप्त नागरिकांनी सदर बझार पोलिस ठाण्यात आणून खासगी वजनकाट्यावर लावले. पोलिसांनी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली. मोजमाप केले आणि खात्री होताच त्यानंतर वजनमापे अधिकाऱ्यांशी संपर्क करून ठाण्यात प्रत्येक गॅस सिलिंडरचे व्हिडिओ शूटिंग करीत वजन केले. त्यावेळी वाहनातील ११ टाक्यांमधील तीन सिलिंडर टाक्यात प्रत्येकी दोन किलो गॅस कमी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ते सिलिंडर सीलबंद होते.
शास्त्री नगर, मौला अली चौक, सिद्धार्थ सोसायटी, लष्कर, उत्तर सदर बझार या भागात हातावरील पोट असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक झाली की आणखी काय तांत्रिक प्रकार आहे, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp