Saturday, September 14, 2024
Homeशैक्षणिकअकोला मुलींच्या आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेश अर्ज दाखल करा- प्राचार्य शरदचंद्र...

अकोला मुलींच्या आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेश अर्ज दाखल करा- प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांचे आवाहन.

ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला दि.9 – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची),अकोला येथे प्रवेश प्रक्रियेला सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सोमवार 12 जूनपासून नियमित सुरू असणार आहे. तरी इच्छुक महिला व विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

आयटीआय (मुलींची),अकोला येथे दोन वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या दोन व्यवसायाला प्रवेश होणार असून एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (इंग्रजी), ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायांना प्रवेश दिल्या जाणार आहे. तसेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी(आय.एम.सी.) अंतर्गत येणाऱ्या जागा करिता या वर्षी अत्यंत कमी प्रवेश शुल्क आकारले जाणार असून प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ती रक्कम परत मिळणार असल्याची माहिती दिली.

मुलींची आयटीआय येथे समुपदेशन केंद्र नियमित वेळेत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया, विविध व्यवसाय, प्रवेश अर्ज संदर्भातील इत्यंभूत माहिती केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकरिता संस्थेमध्ये महिला वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा प्रशिक्षणार्थींना दिला जाईल. तरी अधिकाधिक महिला आणि मुलींनी ऑनलाइन पद्धतीने admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज दाखल करावे, असे आवाहन प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp